शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक संप

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या वतीने प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी अध्यक्ष आर.बी.सिंह यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय लाक्षणिक कामबंद आंदोलन पुकारण्यात आला आहे. या आंदोलनात फैजपूर शहरातील धनाजी नाना महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर कमचारी यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर काम बंद आंदोलनात सहभाग नोंदविला आहे. प्रलंबित असलेल्या मागण्या पुर्ण कराव्यात अशी मागणी आंदोलनातून केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या अनेक दिवस महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यापैकी (१)जुनी पेन्शन योजना लागू करावी (२) रद्द केलेली सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना पुन्हा सुरू करावी व रद्द करण्यात आलेला शासन निर्णय पुनर्जीवित करावा (३) १०,२०,३० लाभाची योजना विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करावी, (४) ५८ महिन्यांची सातवा वेतन आयोगाची थकबाकी त्वरित मिळावी (५) विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावर मोठ्याप्रमणावर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत ती सर्व पदे त्वरित भरण्यात यावी अशा अनेक मागण्यांसाठी वारंवार शासनाशी चर्चा करून सुद्धा शासनाने दखल घेतली नाही, खोटे आश्वासन देत वेळकाढू धोरण राबविले आहे, म्हणून शासन दरबारी आवाज बुलंद करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महासंघाने हे पाऊल उचलले आहे. हा लाक्षणिक संप आहे, परंतु आमच्या मागण्या वेळेवर पूर्ण झाल्या नाहीत तर यापुढे बेमुदत संप पुकारण्याची आमची तयारी आहे म्हणून शासनाने वेळीच या गोष्टीची दखल घ्यावी व आमच्या न्याय मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात अन्यथा नाईलाजाने महासंघाला बेमुदत संप पुकारावा लागेल. यामुळे विद्यार्थ्यांवर तसेच प्रशासनावर होणारा विघातक परिणामांची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असे मत शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूरचे स्थानिक शाखेचे अध्यक्ष आर.आर.जोगी, उपाध्यक्ष आर.वाय. तायडे, सचिव: पवन अजलसोंडे यांनी सांगितले.

प्रसंगी आंदोलनाला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व महाविद्यालय प्राध्यापक संघ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्राचार्य फोरम चे अद्यक्ष तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी,उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय प्राध्यापक संघ, विविध कर्मचारी संघांचे अध्यक्ष तसेच तापी परिसर विद्या मंडळ, फैजपूर संस्थेचे पदाधिकारी उपाध्यक्ष एस.के.चौधरी, सचिव एम. टी. फिरके, नियामक मंडळाचे सदस्य डॉ. जी.पी. पाटील, उपप्राचार्य व्ही.सी. बोरोले यांनी भेट देऊन आपला पाठिंबा दर्शविला आहे

आंदोलनात धनाजी नाना महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघ चे अध्यक्ष आर.आर.जोगी उपाध्यक्ष अर. वाय. तायडे. तसेच दिगंबर वाघुळदे, ललित पाटील, डी. एस. चव्हाण,गुलाब वाघोदे,मयूर महाजन, राजेंद्र ठाकूर, डी.के.तायडे, एन.व्ही.जोगी, फरीद तडवी, सहर्ष चौधरी, दिलीप मेढे सुरेखा सोनवणे, प्रमोद अजलसोंडे व संघटनेचे इतर सदस्य उपस्थित होते.

Protected Content