जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील फुपणी ग्रामपंचायत आणि माजी सरपंच डॉ कमलाकर पाटील यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण सप्ताह आयोजन करण्यात आले होते. आज गुरूवार १२ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता या सप्ताहाचा समारोप करण्यात आली. सप्ताहात वाटप केलेले वृक्ष १५ ऑगस्ट रोजी मान्यवरांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे हे होते. तर प्रमुख पाहुणे माजी पंचायत समिती सभापती शितल कमलाकर पाटील, सरपंच यमुना सपकाळे, ग्रामपंचायत सदस्या कमलताई वाघ, गजानन सपकाळे, कैलास सपकाळे आदी उपस्थित होते. डॉ.कमलाकर पाटील यांच्या पुढाकाराने आज सर्व शाळा प्राथमिक, माध्यमिक भोकर गण पंचायत मध्ये ऑक्सीजन देणारी देणारी वड, पिंपळ व कडुनिंबाचे रोपे व सरंक्षक जाळ्या देण्यात आल्या. वृक्षांचे रोपण स्वातंञ्यदिनी १५ ऑगस्टला प्रत्येक शाळेत मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. डॉ.कमलाकर पाटील यांनी स्व खर्चाने सुमारे ५०० वृक्षलागवड वसंवर्धनाचा संकल्प केला असून परिसरातील सर्व शाळांमध्ये वृक्षवाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. गटविकासअधिकारी शशिकांत पाटील यांनी डॉ. कमलाकर पाटील यांच्या समाजोपयोगी उपक्रमालाबद्दल अभिनंदन केले. अशीच समाजसेवा, सामाजिक कार्य, विद्यार्थी हिताची कामे आपल्या हातून घडो अशी मनोकामना व्यक्त केली. सर्व शिक्षक बंधुभगिनींना देखील शैक्षणिक कार्य आता जोमाने शाळा सुरु झाल्यावर करावे अशी सूचना दिली.