Home Cities चाळीसगाव भारतीय हवाई दलाच्या कारवाईने चाळीसगावात आनंदोत्सव साजरा ( व्हिडीओ )

भारतीय हवाई दलाच्या कारवाईने चाळीसगावात आनंदोत्सव साजरा ( व्हिडीओ )


चाळीसगाव (प्रतिनिधी) भारतीय हवाई दलाने आज दहशतवाद्यांच्या पाकिस्तानमधील ट्रेनिंग कँपवर केलेल्या हवाई हल्ल्यात ३०० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. याचा जल्लोष म्हणून सह्याद्री प्रतिष्ठान व संभाजी सेना चाळीसगाव यांच्या वतीने आज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात (सिग्नल पॉईंट) पाकिस्तानच्या विरोधात घोषणा देऊन व फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला.

यावेळी ‘भारतीय सैन्य दल जिंदाबाद’, ‘भारत माता की जय’, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दिलीप घोरपडे, संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाट, रवींद्र सूर्यवंशी, अजय जोशी, शरद पाटील, मुराद पटेल, निलेश हमलाई, सह्याद्री प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष विनोद शिंपी, वसुंधरा फाऊंडेशनचे सचिन पवार, शहराध्यक्ष दिनेश घोरपडे, युवा तालुकाध्यक्ष हेमंत भोईटे, गौरव पाटील, पलास राखुंडे, विजय गायकवाड, संतोष येवले, सोहन येवले, आरिफ खाटीक, पप्पू राजपूत, योगेश शेळके, जितू वाघ, दिपक राजपूत, निलेश खैरनार, चेतन भोई, कुणाल भोई, निलेश गुंजाळ, मोनू जाधव, बबलू चव्हाण, निसार शेख, आबासाहेब सैंदाणे, भुषण पाटील, अजय कोळी, युवराज मलतकर, सचिन पाटील, समीर शिंपी, संभाजी सेनेचे अविनाश काकडे, दिवाकर महाले, कृष्णा पाटील, अनिल शिरसाट, ज्ञानेश्वर पगारे, सुरेंद्र महाजन, गिरीश पाटील, संदीप जाधव, बंटी पाटील आदी उपस्थित होते.

पहा : सह्याद्री प्रतिष्ठान व संभाजी सेनेतर्फे साजरा केलेल्या आनंदोत्सवाचा व्हिडीओ.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound