ब्रिटिश कालीन नाला येत्या १५ दिवसात मोकळा करा – मुख्याधिकारी शोभा बाविस्कर

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा नगरपरिषद क्षेत्रातील सिटी सर्व्हेतील जागेवरील बांधकाम प्रगतीत पथावर आहे. मात्र,  ब्रिटिश कालिन प्रवाहित नाला संबंधित व्यावसायिकाने नगरपरीषदेची कोणतीही परवानगी न घेता आरसीसी ह्युम पाईप टाकुन बंदिस्त केला. येत्या १५ दिवसात नाला मोकळा न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस पाचोरा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी संबंधित बांधकाम व्यावसायिकांना दिली आहे.

पाचोरा नगरपरिषद क्षेत्रातील सिटी सर्व्हे नं. ३३२१ ते ३३३६ या जागेवरील प्रस्तावित बांधकामासाठी नगरपालिकेने येथील बांधकाम व्यावसायिक राकेश केसवाणी यांचेसह संबंधित व्यावसायिकांना उक्त संदर्भीय क्रं.१ अन्वये बांधकाम परवानगी देण्यात आलेली आहे. त्यानुसार सदर जागेवरील बांधकाम प्रगतीत पथावर आहे. सदर जागेत ब्रिटिश कालिन प्रवाहित नाला असुन या नाल्यावर संबंधित व्यावसायिकाने  नगरपरीषदेची कोणतीही परवानगी न घेता आर. सी. सी. ह्युम पाईप टाकुन बंदिस्त केला असल्याने व टाकलेल्या ४ फुट व्यासाच्या आर. सी. सी. पाईपातुन सदर नाल्यातील संपूर्ण सांडपाणी वाहुन न जाता ते अडकण्याची दाट शक्यता असल्याने टाकलेला ४ फुट व्यासाचा आर. सी. सी. पाईपा शेजारी अजुन एक ४ फुट व्यासाचा आर. सी. सी. पाईप टाकावा अथवा संपूर्ण नाल्याचे आर. सी. सी. बांधकाम तात्काळ करुन देण्यासाठी नगरपालिकेने कळविले आहे. त्यावर व्यावसायिक राकेश केसवाणी यांच्या अर्जानुसार सदर कामासाठी तिन महिन्यांची मुदत मागीतली होती.

मात्र अद्याप पर्यंत संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी काम करुन दिलेले नसल्याने सदर जागेतील प्रवाहीत नाला बंदिस्त केला असल्याने याबाबत नगरपालिका व गर्जा महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक अनिल महाजन यांनी जिल्हाधिकारी व संचालक नगररचना, महाराष्ट्र राज्य वरळी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. दाखल तक्रारीचे अनुषंगाने जिल्हाधिकारी, जळगांव यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे अंतिमरित्या सदर नोटीस मिळाले पासुन १५ दिवसांचे आत स्वखर्चाने बंदिस्त केलेला नाला खुला (मोकळा) करुन पुर्ववत करुन द्यावा. विहीत मुदतीत बंदिस्त नाला खुला (मोकळा) करुन पुर्ववत न करुन दिल्यास संबंधित बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध कायदेशिर कारवाई करण्यात येईल. तसेच सदर जागेवरील बांधकामासाठी नगरपरीषदेने उक्त संदर्भीय क्रं. १ अन्वये दिलेली बांधकाम परवानगी तुर्तास स्थगित करण्यात आली आहे.

सदर जागेवर कुठल्याही स्वरुपाचे बांधकाम करु नये. अथवा सुरु ठेवू नये. याबाबत जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या आदेशावरून पाचोरा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी राकेश केसवाणी यांचे सह संबंधित व्यावसायिकांना दिलेली बांधकाम परवानगी स्थगित केली आहे व बुजवलेला ब्रिटिशकालीन नाला स्वखर्चाने मोकळा करून देण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिलेली आहे.  गैरमार्गाने चार फुटाच्या व्यासाचा सिमेंट पाईप तात्काळ काढण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. १५ दिवसाच्या आत हा नाला मोकळा न केल्यास पाचोरा नगरपालिकेतर्फे केसवाणी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईन अशी नोटीस पाचोरा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी संबंधित बांधकाम व्यावसायिकांना दिली आहे.

 

Protected Content