Home Cities जळगाव संत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्त कोदोलीत संविधान जागर अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम

संत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्त कोदोलीत संविधान जागर अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम


जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जामनेर तालुक्यातील कोदोली येथे संविधान जागर अभियानांतर्गत संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त ग्रामस्थांनी एकत्र येत स्वच्छता मोहीम राबवून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. यावेळी गावातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे व परिसर स्वच्छ करण्यात आला तसेच संत गाडगेबाबांच्या विचारांचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून देण्यात आले.

या अभियानादरम्यान बॅनरच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचविणे आणि त्यांचे आचरण जीवनात उतरविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या स्वच्छता मोहिमेत व्ही. पी. पाटील, समाधान कोळी, खुशाल गाभे, रवीन वाघ, सुशीला आव्हाड आणि अरुणा आव्हाड यांनी सक्रिय सहभाग घेतला.

यावेळी मार्गदर्शन करताना व्ही. पी. पाटील म्हणाले की, महापुरुषांच्या विचारांवर चालणे आणि त्यानुसार वागणे हेच त्यांना खरे अभिवादन आहे. महापुरुषांना केवळ प्रतीकांमध्ये किंवा कर्मकांडांमध्ये कैद करून ठेवू नये, कारण त्यामुळे त्यांचे विचार हळूहळू समाजातून लोप पावतात.

या उपक्रमामुळे गावात स्वच्छतेबाबत जागर निर्माण झाली असून संत गाडगेबाबांच्या विचारांची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न कोदोली ग्रामस्थांनी केला आहे.


Protected Content

Play sound