Home धर्म-समाज तरुणाईच्या वतीने स्वच्छता अभियान

तरुणाईच्या वतीने स्वच्छता अभियान

0
31

खामगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  बसस्थानक ते जयपूर फाटापर्यंत दोन्ही रस्त्यामध्ये असलेल्या डिव्हायडरवर लावलेले झाड बोगनवेल रस्त्यावर आलेले आहेत. त्याची कटिंग करून आज रविवार, दि ३१ जुलै रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

बुधवार, दि. ३ ऑगस्ट रोजी श्रींची पालखी या मार्गाने जाणार आहे. हजारोच्या संख्येने भक्तगण याच रस्त्याने जाणार आहेत. या रस्त्यावर आलेले बोगनवेल चेहऱ्याला लागून अपघात होऊ शकतो. त्यामुळे तरुणाईच्या वतीने रस्त्यामध्ये आलेले काटेरी बोगनवेल कटिंग करून आज रविवार, दि ३१ जुलै रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये तरूण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.


Protected Content

Play sound