फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फैजपूर शहरातील धनाजी नाना महाविद्यालयाच्या इंटरनल क्वालिटी अश्युरंस सेल (आय क्यू ए सी ) अंतर्गत राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने स्मशानभूमी स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले.
धनाजी नाना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ अनिल भंगाळे व कर्नल अभिजीत महाजन समादेशक अधिकारी, १८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत व एनसीसी कॅडेट्स यांनी स्मशानभूमी स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबविले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ एस व्ही जाधव, हवालदार सतीश कुमार व कॅडेट्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मानवी जीवनाचे अंतिम सत्य मुक्तीधाम येथेच असल्याने मानवी जीवन किती अनमोल आहे ? व लाभलेल्या क्षणनक्षणाचा सकारात्मक उपयोग करून स्वतःच्या आयुष्यासोबतच परिवार, समाज व देशाच्या उत्थानासाठी समर्पण करावे यासोबतच अत्यंत महत्त्वाच्या मात्र तितक्याच दुर्लक्षित गंतव्यस्थानाबद्दल लोकांची अनास्था दूर व्हावी या उदात्त हेतूने स्मशानभूमी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी आयोजनामागील हेतू विशद केला. एनसीसी कॅडेटसच्या माध्यमातून राबविल्या गेलेल्या स्वच्छता अभियानातून समाजातील इतर घटकांनीही प्रेरणा घ्यावी व आपले जीवन सत्कारणी लावावे यासोबत आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ व सुंदर राखावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ हरीश नेमाडे आय क्यू एसी चेअरमन, डॉ ताराचंद सावसाकडे क्रायटेरिया हेड यांचे मार्गदर्शन लाभले. सीनियर अंडर ऑफिसर गणेश चव्हाण, ज्युनिअर अंडर ऑफिसर योगेश कचरे, ज्युनिअर अंडर ऑफिसर अमोल वानखेडे, ऋषिकेश पाटील, वीरेंद्र जैन, ओमसिंग राजपूत, राजेश पाटील, केतन इंगळे, रितेश बोदडे, विशाल बोदडे इत्यादी कॅडेट्सनी परिश्रम घेतले.