यावल प्रतिनिधी । येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विज्ञान मंडळ व तुळजाई बहुउद्देशीय संस्थेतर्फे ‘स्वच्छ सर्वेक्षण कार्यशाळा’ उत्साहात पार पडली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावल नगरपरिषदेचे आरोग्य विभागाचे सभापती प्रा.मुकेश येवले होते. कार्यक्रमात तुळजाई बहुउद्देशीय संस्था जळगाव येथील भूषण लाडवंजारी यांनी कार्यशाळेची ध्येय व उद्दिष्टे विशद केली. त्यांनी विचार मांडले की, स्वच्छता दोन प्रकारची असते. स्वतःची स्वच्छता व सार्वजनिक स्वच्छता; स्वतःच्या स्वच्छतेबरोबर सार्वजनिक स्वच्छता देखील महत्त्वाची असते. स्वच्छतेची जनजागृती कोणी व कशी करावी याबाबत त्यांनी टिप्स दिल्या.
मयूर लाडवंजारी यांनी ही गट चर्चेद्वारे विद्यार्थ्यांशी हितगूज साधले. यावेळी उपप्राचार्य एम.डी.खैरनार, प्रा.एस.आर.गायकवाड, प्रा. मयूर सोनवणे हे उपस्थित होते. सदर कार्यशाळा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.आर.डी.पवार यांनी केले, तर आभार डॉ.एच.जी.भंगाळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेंद्र धनगर, भरत पाटील,सागर पाटील, भारत वानखेडे,नितेश अडकमोल यांनी परिश्रम घेतले.