मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांकडून त्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेने वायकर यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.
जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी त्यांची चौकशी सुरू होती. तसेच त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. रवींद्र वायकर त्यांच्या पत्नी मनिषा आणि त्यांचे भागीदार आसू नेहलानी, राज लालचंदानी, प्रिथपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरूण दुबे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.