वरणगाव दत्तात्रय गुरव । महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार आजपासून आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील नेहरू विद्या मंदिर या प्रशालेत आज प्रशाला समितीची बैठक होऊन उद्यापासून प्रशाला सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याध्यापिका साधना लोखंडे यांनी दिली आहे.
गेल्या दीड महिन्यापासून तळवेल गावामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे तळवेल ग्रामपंचायतीने प्रशाला सुरू करण्याची रितसर परवानगी दिली आहे. त्यानुसार आज प्रशाला समितीची बैठक घेण्यात आली व उद्यापासून आठवी ते दहावीचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन केले आहे. उद्या पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी प्रशालेतील विद्यार्थ्यांची व शिक्षकांची कोरोना टेस्ट केल्यानंतर व प्रशाला सुरू होणार आहे. प्रशाळेच्या वतीने प्रशाळेतील सर्व वर्ग सॅनिटाझेशन करून घेण्यात आलेली आहे. आठवी ते दहावी 207 विद्यार्थ्यांची पटसंख्या असून एक दिवस मुलींचा वर्ग एक दिवस मुलांचा वर्ग घेण्यात येणार आहे. कोरोनची सर्वतोपरी खबरदारी घेऊन व पालकांची रीतसर लेखी परवानगी घेऊन प्रशाला सुरू करणार असल्याची माहिती मुख्याध्यापिका लोखंडे यांनी दिली आहे.