किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी; परस्परविरोधात गुन्हे दाखल

अमळनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी| तालुक्यातील गांधली गावातील बसस्थानकाजवळ रस्त्यावर उभ्या राहण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील गांधली गावात राहणारे रवींद्र निळकंठ बोरसे आणि रोहिदास खंडू पाटील यांच्यात रस्त्यावर उभ्या राहण्यावरून गुरुवारी २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता किरकोळ वाद झाला. या वादातून रविदास खंडू पाटील आणि त्याचा मुलगा वैभव रोहिदास पाटील या दोघांचे रवींद्र निळकंठ बोरसे, गौरव रवींद्र बोरसे आणि चेतन रवींद्र बोरसे यांच्यात तुफान हाणामारी झाली. यामध्ये एकमेकांना जीवेठार मारण्याच्या धमक्या देखील देण्यात आल्या. या हाणामारीत काहींनी लाथाबुक्क्यांनी तर काहींनी लोखंडी रॉ मारून जखमी केल्याचे समोर आले आहे. दरम्यान या घटनेबाबत अमळनेर पोलिसात एकमेकांविरोधात तक्रार देण्यात आली. त्यानुसार रवींद्र निळकंठ बोरसे, गौरव रवींद्र बोरसे, चेतन रवींद्र बोरसे तसेच दुसऱ्या गटातील रोहिदास खंडू पाटील आणि वैभव रोहिदास पाटील सर्व राहणार गांधली ता. अमळनेर यांच्या विरोधात गुरुवारी २६ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल कैलास शिंदे आणि संदेश पाटील हे करीत आहे.

Protected Content