पाळधीत दोन गटात तुफान हाणामारी

धरणगाव पोलीसात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पाळधी बुद्रुक गावातील कोळी वाडा येथे शिवीगाळ केल्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी १० नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. यात दगड, विटा, लाठ्याकाठ्या, फायटर, लोखंडी रॉड व चाकूचा वापर करण्यात आला. यात तीन किरकोळ जखमी झाले आहे. याप्रकरणी शनिवारी ११ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता दोन्ही गटातर्फे दिलेल्या‍ फिर्यादवरून दोन गटातील २२ जणांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिल्या फिर्यादीत बळीराम भगवान साळुंखे (वय-६२) रा. कोळी वाडा, पाळधी बुद्रुक ता.धरणगाव यांनी म्हटले आहे की, शुक्रवार १० नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता काहीजण काहीही कारण नसतांना शिवीगाळ का करतो असा जाब विचाल्याच्या रागातून सात जणांनी बळीराम साळुखे व त्यांचा पुतण्या निलेश श्रीकृष्ण साळुंखे या दोघांना लाठ्याकाठ्या व लोखंडी आसारीने डोक्यावर पाठीवर आणि हातापायांना बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले. याप्रकरणी बळीराम साळुंखे यांनी रात्री साडेबारा वाजता धरणगाव पोलीसात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित आरोपी प्रकाश झीपरून सपकाळे, रमेश पुंडलीक सपकाळे, राजाराम झिपरू सपकाळे, लखन प्रकाश सपकाळे, कल्पेश प्रकाश सपकाळे, महेंद्र रोहिदास सपकाळे, नरेंद्र पुंडलिक सपकाळे सर्व रा. पाळधी बुद्रुक ता.धरणगाव यांच्या विरोधात धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या फिर्यादीत नरेंद्र पुंडलीक सपकाळे यांनी म्हटले आहे की, शुक्रवार १० नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता काहीजण काहीही कारण नसतांना गावातील १४ ते १५ जणांनी लाठ्याकाठ्या, फायटर, दगड, विटा, चाकू, लोखंडी रॉड घेवून नरेंद्र सपकाळे यांच्यासह इतरांना बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. हा प्रकार घडल्यानंतर जखमीअवस्थेत नरेंद्र सपकाळे यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोपान देविदास साळुंखे, बळीराम भगवान साळुंखे, श्रीकृष्ण गंगराम साळुंखे, मच्छिंद्र बळीराम साळुंखे, डिगंबर भास्कर साळुंखे, निलेश कृष्णा साळुंखे, कैलास सोपान साळुंखे, संदपि सुदाम साळुंखे, विष्णू भगवान साळुंखे, भास्कर गंगाराम साळुंखे, कैलास भगवान साळुंखे, वासूदेव बळीराम साळुंखे, ज्ञानेश्वर सोपान साळुंखे, रोहित विष्णू साळुंखे, प्रितम मच्छिंद्र साळुंखे सर्व रा. कोळीवाडा पाळधी ता.धरणगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्याचा तपास पोहेकॉ विठ्ठल पाटील करीत आहे.

Protected Content