मुंबई (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७३ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना कुटुंब नियोजनावर भाष्य केले. पंतप्रधानांनी कुटुंब नियोजनावर मांडलेले विचार हे ‘समान नागरी कायद्या’च्या दृष्टीने तिसरे पाऊल आहे, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. दरम्यान, देशात आता समान नागरी कायदा कधी लागू करणार? असा सवालही यावेळी त्यांनी केला.
पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात देशातील अनेक मुद्यांना हात घालत देशाला विकासाच्या मार्गावर घेवून जाणार असल्याचे म्हटले होते. त्यांच्याच भाषणाचा आधार घेत आज शिवसेनेचे मुखपत्र असणारे सामनामध्ये उद्धव ठाकरे यांनी सरकारला काही सवाल करत सरकारच्या कार्यपद्धतीची स्तुती केली आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, कुटुंबनियोजन करणे हीच देशभक्ती असल्याचा पुकारा लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी यांनी केल्यामुळे मुसलमान समाजाला देशभक्तीच्या या प्रवाहातदेखील सामील व्हावेच लागेल. जनसंख्या नियंत्रणासाठी कायदा आणावा अशी मागणी आहे व तशा हालचाली सुरू आहेत हे मोदी यांनी भाषणात सांगितले. त्यामुळे समान नागरी कायदा आलाच आहे. देशात धर्माच्या नावावर कायदेबाजी चालणार नाही. देशाच्या मुळावर आलेले धार्मिक कायदे मोदी सरकारने मोडून टाकले. आता देशात एकच कायदा, तो म्हणजे भारतीय घटनेचा! तशी मजबूत पावले पडलीच आहेत. समान नागरी कायदा म्हणजे यापेक्षा वेगळा काय असतो,असे देखील अग्रलेखात म्हटले आहे.
इस्लाममध्ये कुटुंबनियोजनास मान्यता नाही असे आतापर्यंत सांगण्यात आले, पण कुटुंबनियोजन करणे हीच देशभक्ती असल्याचा पुकारा लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी यांनी केल्यामुळे मुसलमान समाजाला देशभक्तीच्या या प्रवाहातदेखील सामील व्हावेच लागेल. जनसंख्या नियंत्रणासाठी कायदा आणावा अशी मागणी आहे व तशा हालचाली सुरू आहेत हे मोदी यांनी भाषणात सांगितले. त्यामुळे समान नागरी कायदा आलाच आहे. देशात धर्माच्या नावावर कायदेबाजी चालणार नाही. देशाच्या मुळावर आलेले धार्मिक कायदे मोदी सरकारने मोडून टाकले. आता देशात एकच कायदा, तो म्हणजे भारतीय घटनेचा! तशी मजबूत पावले पडलीच आहेत,असेही अग्रलेखात म्हटले आहे.