जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील टॉवर चौकातून कोर्ट चौकापर्यंत विनापरवानगी शिवजयंतीची मिरवणूक काढल्याप्रकरणी तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागु नियमांचे उल्लंघन केल्याने बँड पथकासह मिरवणुकीत सहभागी ३० पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सविस्तर माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून नियम लागु करण्यात आले आहे. तसेच जोरजोरात वाद्य वाजवून मिरवणूक काढण्यासही बंदी करण्यात आली होती. असे असतानाही शनिवार, १९ फेब्रुवारी रोजी शिवाजीनगर परिसरातील संतोष पाटील, भीमराव मराठे, नवल सोनवणे बंटी बांदल यांच्यासह इतरांनी टॉवर चौकातून कोर्ट चौकातील शिवतीर्थ मैदानापर्यंत वाद्य वाजंत्रीच्या तालात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने मिरवणूक काढली. या मिरवणुकीत सहभागी सर्वांनी कोरोनाच्या नियमांचेही उल्लंघन करण्यात झाले. अशा आशयाच्या पोलिस नाईक नरेंद्र ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसात मिरवणुकीत सहभागी संतोष पाटील, भीमराव मराठे नवल सोनवणे, अमर राजपूत , बंटी बांदल , सोनू सपकाळे कौतिक भोसले ,भूषण जाधव, राजेश ठोसर, लल्ला राजपूत, नरेंद्र शिंदे सर्व रा.शिवाजीनगर व सम्राट म्युझिकल बँड चे संचालक सुरेश भालेराव व त्यांच्या पथकातील इतर अशा ३० जणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.