नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरुद्ध ईशान्येकडील राज्यांमध्ये आंदोलने तीव्र झाली आहेत. आज सकाळपासून आसाममध्ये नागरिक अनेक ठिकाणी जाळपोळ करून निदर्शने करत आहेत.
सोमवारी लोकसभेत बारा तासांच्या मॅरेथॉन आणि वादळी चर्चेनंतर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक ३११ विरुद्ध ८० मतांनी मंजूर झाले आहे. हे विधेयक आज राज्यसभेत मांडले जाणार आहे. काँग्रेससह अनेक पक्षांनी या दुरुस्ती विधेयकाला विरोध दर्शवला असून, ईशान्येकडील राज्यांमध्ये या विधेयकाविरोधात आंदोलने तीव्र झाली आहेत. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात त्रिपुराची राजधानी आगरतळा येथेही नागरिकांची निदर्शने केलीत. तर नारिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात आसाममध्ये ११ तासांचा बंद पुकारण्यात आला आहे. तसेच दिब्रुगड येथे स्थानिकांचा नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध असून आंदोलनासाठी नागरिक रस्त्यावर, ठिकठिकाणी जाळपोळ करताय.