एरंडोल, प्रतिनिधी । येथील महेश युवा संघटना व माधवराव गोळवलकर पतपेढी,जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ५६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
जिल्ह्याचे पालकमंञी गुलाबराव पाटील व नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी शिबीरास भेट देऊन महेश युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले.पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव व सहाय्यक पोलिस निरीक्षक तुषार देवरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नगरसेवक कुणाल महाजन यांनी प्रथम रक्तदान करून शिबीरास सुरूवात केली. याप्रसंगी मनोज बिर्ला, सुनिल झंवर, नितीन बिर्ला, नितीन मालू यांचे मार्गदर्शन लाभले. शिबीराच्या यशस्वीतेसाठी विकी बिर्ला, कुंदन बिर्ला, मयुर मालू, याज्ञिक मालू, देवेन मालू, दिपक तोतले, पवन तोतले, गोविंद बिर्ला, आनंद बिर्ला यांनी परिश्रम घेतले.