पहूर ता. जामनेर प्रतिनिधी । पहूर पेठ येथील वार्ड क्रमांक १मध्ये संतोषी मातानगर, शिवनगर, गोविंद नगर या भागात पक्के रस्ते, गटारी, शोषखड्डे या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने या समस्या लवकरात लवकर सोडविण्यात याव्या, यासाठी संतोषी माता नगर येथील रहिवाशांनी पहूर पेठ ग्रामपंचायतीला लेखी स्मरणपत्र सादर केले.
विविध विकास कामांना दुर्लक्षित असलेला वार्ड क्रमांक १ मध्ये पक्के रस्ते गटारी तसेच शोषखड्डे यासह विकास कामे रखडलेली आहेत . ग्रामपंचायतीकडून या भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे . तसेच संतोषीमाता नगरातील अतिक्रमण काढून अरुंद रस्ते मोठे करूनरस्त्याच्या दुतर्फा साईड पट्ट्या मुरूम टाकून भराव्या ,जेणेकरून वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही ,यासह विविध मागण्यांच्या निवेदन ग्रामपंचायतील एक महिन्या अगोदर देण्यात आले होते .परंतु ग्रामपंचायतीने दुर्लक्ष करून या भागातील विकास कामांना सुरुवात न केल्यामुळे आज लेखी स्वरूपात स्मरणपत्र देण्यात आले .वार्ड क्रमांक १ मधील विकास कामांना प्राधान्य न दिल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा ईशारा लेखी निवेदनाद्वारे ग्रामविकास अधिकारी डी .पी . टेमकर तसेच सरपंच पती रामेश्वर पाटील यांना देण्यात आला आहे .यावेळी वार्ड क्रमांक १ मधील रहिवासी प्रवीण कुमावत, शरद बेलपत्रे , चेतन रोकडे, अतुल लहासे, सचिन कुमावत, नितिन बनसोडे माजी उपसरपंच इका पहिलवान, माजी उपसरपंच रवी मोरे, शिवसेनेचे पदाधिकारी संजय तायडे आदींची उपस्थिती होती.
तीन लाखांचे विकास कामे लवकरच सुरू करणार असून वार्ड क्रमांक १ मधील गटारी पक्या रस्त्यांसाठी अडचणीचे ठरणारे अतिक्रमण काढण्यात येऊन रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. इतरही विकासकामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार असून ग्रामस्थांनी कर वसुलीसाठी सहकार्य करावे.