जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मू.जे. महाविद्यालय परिसरातील पोस्टल कॉलनीतील कॅफे MH 19 नजीक सुरु असलेल्या अमृत योजनेंतर्गत पाईप लाईनच्या कामामुळे आसपासच्या नागरिकांचे घरगुती पाण्याचे पाईप कट झाल्याने गेल्या सुमारे महिनाभरापासून पाण्यासाठी त्यांचे हाल होत आहेत.
सविस्तर माहिती अशी की, पाण्याचे पाईप तुटल्यानंतर गेल्या महिनाभरापासून महापालिका व अमृत योजना ठेकेदार दोघेही एकमेकांकडे बोट दाखवून वेळ काढूपणा करीत आहेत. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.