नागरिक हैराण : वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी निवेदन

पहूर ता. जामनेर प्रतिनिधी । पहूर येथे गेल्या पंधरा दिवसापासून रात्री-बेरात्री विजेचा लपंडाव सुरू आहे. वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक हैराण झाले असून वीज पुरवठा सुरळीत व्हावा, या मागणीसाठी येथील उपविभागीय महाराष्ट्र राज्य मंडळ अधिकाऱ्यांना ग्रामस्थांतर्फे निवेदन देण्यात आले आहे. 

पहूर हे गांव जळगांव औरंगाबाद महामार्गावरील चौफुली वरील गांव असून  अतिसंवेदनशील आहे. याठिकाणी केव्हाही  कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.  आपणास वारंवार लेखी व तोंडी सूचना केली तरी अजून सुधारणा होत नाही पहूर गावात  वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे.          

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे मच्छरांचा त्रास होत असून यामुळे साथीच्या आजाराची शक्यता निर्माण झाली आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपण व आपले कर्मचारी जबाबदार राहतील अशा प्रकारचे निवेदन आज सकाळी दहा वाजता शहरातील सर्व पक्ष पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी उपविभागीय अधिकारी सोनवणे यांना निवेदन सादर केले. यावेळी सरपंचपती  रामेश्वर पाटील, माजी सरपंच  शंकर जाधव,  उपसरपंच राजू जाधव, ईश्वर देशमुख, संदीप बेढे, भारत पाटील, पत्रकार गणेश पांढरे, नटराज गोयर यांच्यासह गावातील राजकीय पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Protected Content