पाचोरा(प्रतिनिधी)। येथील संभाजीनगर पुराणी इंग्लिश मीडियम स्कूल या महाविद्यालयात दहावीची परीक्षा सुरू असल्याने मराठी या विषयाच्या पेपरला विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त अभियान करण्यासाठी केंद्रप्रमुख एम.डी.पाटील, कृष्णापुरी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक किरण पाटील, जागृती विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वाणी यांनी विद्यार्थी व विद्यार्थ्यांना बारकाईने चेकिंग करून विद्याथ्यना वर्गात प्रवेश दिला.
यावेळी जो कोणी कॉपी करताना आढळून आल्यास व मोबाईल दिसल्यास त्या विद्यार्थ्यावर कारवाई केली जाईल. कोणत्याही विद्यार्थ्यांनी कॉफी करून आपले भविष्य धोक्यात आणू नये व शांततेने पेपर लिहून यशस्वी व्हावे, अश्या सूचना त्यांनी दिलेले आहेत तसेच बाहेरगावाहून आलेल्या भरारी पथकाला जर चौकशी करीत असताना कॉपी किंवा मोबाईल जर दिसून आला त्या वर्गातील विद्यार्थी व शिक्षक स्वतः जबाबदार राहतील अशी कडक सूचना विद्यार्थ्यांना व पालकांना देण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांना वेळेवरती पेपराचे वाटप करून त्यांना शांततेत परीक्षा देण्याचे आव्हान केले आहे.