चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील चुंचाळे येथे जळगाव येथील प्रकल्प संचालक अनिल भोकरे यांचा सामाजिक आणि कृषी क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल चाळीसगाव येथे झालेल्या कार्यक्रमात ‘खान्देश रत्न’ पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले.
यानिमित्ताने चुंचाळे येथे सत्काराचा व कृषी विभाग,आत्मा व श्री समर्थ सेंद्रिय शेती गटातर्फे शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्यांचा सत्कार प्रगतशिल शेतकरी उदय बालमुकुंद महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी यात पुणे सहसंचालक कृषी आयुक्त कार्यालय येथील श्री. कुलथे साहेब, प्रकल्प संचालक कृषी अधीक्षक कार्यालय जळगाव येथील अनिल भोकरे, अमळनेर येथील उपविभागीय कृषी अधिकारी जाधवर, चोपडा तालुका कृषी अधिकारी पांडुरंग चौधरी, चोपडा आत्मा समन्वयक महेंद्र साळुंखे, कृषी पर्यवेक्षक सुनील गुजराथी ,दिनेश पाटील व महेश सनेर, कृषी सहाय्यक दिपक पाटील,मंडळ अधिकारी आर.एम. पाटील, गटाचे अध्यक्ष नितीन चौधरी, उपाध्यक्ष अमरनाथ चौधरी तसेच प्रगतशिल शेतकरी अवधुत महाजन उपस्थित होते.