Home क्रीडा ख्रिस गेल वनडे क्रिकेटमधून संन्यास  घेणार

ख्रिस गेल वनडे क्रिकेटमधून संन्यास  घेणार


नवी दिल्ली (वृत्तसेवा) आगामी क्रिकेट वर्ल्ड कप झाल्यानंतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेणार असल्याची घोषणा वेस्ट इंडीजचा तुफान फलंदाज ख्रिस गेलने केली आहे. वेस्ट इंडीजच्या क्रिकेटरने ट्वीट करून यासंदर्भातील माहिती जारी केली आहे.

 

येत्या मे ते जुलै पर्यंत इंग्लंड आणि वेल्स येथे वर्ल्ड कप रंगणार आहे. 1999 मध्ये डेब्यू करणारा ख्रिस गेल वेस्ट इंडीजकडून सर्वाधिक शतक लावणारा फलंदाज आहे. तो वेस्ट इंडीजचा ब्रायन लारानंतर सर्वाधिक धावा काढणारा क्रिकेटर आहे. गेलने आतापर्यंत 284 वनडे सामन्यांमध्ये एकूणच 9,727 धावा काढल्या आहेत. यामध्ये 23 शतक आणि 49 अर्धशतकांचा समावेश आहे. ब्रायन लाराच्या नावे वनडे सामन्यांत 10,405 धावांचे विक्रम आहे. 39 वर्षांच्या ख्रिस गेलने 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये झिम्बाब्वे विरोधात 215 धावा काढल्या होत्या. वेस्ट इंडीजच्या वनडे क्रिकेट इतिहासात एकाच सामन्यात इतक्या धावा काढणारा तो एकमेव फलंदाज आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound