चौघुले प्लॉट गोळीबार प्रकरण: लिंबू राक्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शनिपेठ परिसरातील चौगुले प्लॉट भागात व्हाट्सअपवर चिथावणी देणारे स्टेटस ठेवल्याने वादातून गोळीबार झाला होता. यातील संशयित आरोपी लिंबू राक्याला शनीपेठ पोलीसात अटक केली. आज न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अधिक माहिती अशी की, चौगुले प्लॉट भागात व्हाट्सअपवर चिथावणी देणारे स्टेटस ठेवल्याने ११ एप्रिल २०२१ रोजी सारवान व शिंदे गटात वाद उफाळून गोळीबाराची सुमारास घडली होती. हाणामारी व गोळीबारप्रकरणी अमृत यशवंत शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनू भगवान सारवान, निलेश नरेश हंसकर, लखन भगवान सारवान, विक्रम राजू सारवान, हेमंत घुसर व सनी मिलांदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तर नीलेश रमेश हंसकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विजय जयवंत शिंदे राहुल अशोक शिंदे किशोर जयवंत शिंदे राकेश उर्फ लिंबू राक्या चंद्रकांत साळुंके (सर्व रा. चौघुले प्लॉट) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेले सर्व संशयित न्यायालयीन कोठडीत कारागृहात आहेत. याच गुन्ह्यात फरार असलेला संशयित लिंबू राक्या यास काल सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ममुराबाद नाक्याजवळून शनिपेठ पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्याला आज मंगळवारी जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.