यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने २१ मे मंगळवार रोजी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यात तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्यु.कॉलेजचा बारावीचा निकाल हा ९८ टक्के लागला असून सांगवी केंद्रात सर्वात जास्त निकाल लागण्याचा प्रथमच मान विद्यालयाने मिळविला आहे. यात एकूण ३७ पैकी ३६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यात ३६ विद्यार्थी पास झाले आहेत. शाळेच्या या दैदिप्यमान कामगिरीबद्दल परिसरात शाळेतील शिक्षकांचे व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले. दरम्यान दिवसेंदिवस आपली प्रतिमा उंचावत नेण्याची परंपरा कायम राखत केंद्रात सर्वाधिक जास्त निकाल मिळवीत हे घवघवीत यश संपादन केले आहे.
यात प्रथम क्रमांक देवयानी किशोर चव्हाण ७७.५० टक्के गुण, द्वितीय क्रमांक उज्वला डिगंबर महेश्री ७५.३३ टक्के गुण आणि तृतीय क्रमांक प्रियंका जगदीश सोनवणे ७३.५० टक्के गुण प्राप्त करून यश संपादन केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रकुमार झांबरे, सचिव शरद राणे व सर्व संचालक तसेच प्राचार्य नितीन झांबरे आणि विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे. सदरील यशस्वी विद्यार्थांना प्राचार्य नितीन झांबरे, प्रा.नंदन वळींकार व प्रा.रामेश्वर जानकर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.दरम्यान शाळेने केलेल्या या दैदिप्यमान कामगिरीचे परिसरात व गावकऱ्यांच्या वतीने अभिनंदन व कौतुक होत आहे.