चोपडा (प्रतिनिधी) येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिराने आपल्या उत्तुंग यशाची परंपरा कायम यंदाही कायम राखली आहे. सागर प्रवीण महाजन याने दहावीच्या परीक्षेत 95.40 टक्के गुण मिळवीत संस्था व शाळेच्या उज्ज्वल यशाच्या परंपरेत पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवत सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे.
शाळेच्या एकूण निकालाची टक्केवारी 85 टक्के असून सेमी इंग्रजीच्या चार तुकड्यांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर 90 ते 100 टक्क्याच्या दरम्यान 20 विद्यार्थी तर 80 ते 90 टक्क्यांच्या दरम्यान 42 विद्यार्थी व 75 ते 80 टक्क्यांच्या दरम्यान 25 विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. विद्यालयातून द्वितीय क्रमांक लाड करण उपेंद्र यास 94.60 टक्के तर तृतीय क्रमांक नेवे सिद्धी महेश आणि पाटले प्राची राजू यांना 94.40 टक्के गुण प्राप्त झाले आहेत. शाळेतून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे चोपडा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व्ही सी गुजराथी,चेअरमन राजाभाई मयूर, उपाध्यक्ष मोरेश्वर देसाई, सचिव माधुरीताई मयूर, संचालक चंद्रहासभाई गुजराथी, व सर्व संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापक डी.व्ही.याज्ञिक, उपमुख्याध्यापक डी.के.महाजन, उपप्राचार्य डी.एस.पांडव, पर्यवेक्षक जी.वाय.वाणी, आर.आर.शिंदे, वाय.एच.चौधरी, समन्वयक गोविंदभाई गुजराथी, उल्हासभाई गुजराथी,डी.टी.महाजन माध्यमिक शिक्षक पतसंस्थाचे संचालक विकास शिर्के यांनी अभिनंदन केले आहे.