चोपडा प्रतिनिधी । येथील ललित कला केंद्रात नुकतेच 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट विशेषांक स्पंदन या भित्तीपत्रकाचे माजी सैनिक कैलास मराठे यांच्याहस्ते अनावरण करण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, स्पंदन हे विद्यार्थ्यांनी स्वलिखित हस्ताक्षरात कविता लेख, संग्रीत वेचे, सुविचार, स्वातंत्र्यदिन विशेष हा विषय घेऊन महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभभाई पटेल, स्टॅचू ऑफ युनिटी जगप्रसिद्ध पुतळ्याचे रंगीत चित्र व त्यासोबत चारोळी, स्वलिखित लेख संग्रहात मक लेख कविता व स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून सजवलेले होते. असे हे स्पंदन भित्तीपत्रक स्वातंत्र्यदिनाचे खास आकर्षण ठरले.
या भिती पत्रकाचे माजी सैनिक कैलास रामदास मराठे यांच्याहस्ते अनावरण करण्यात आले. याप्रसंगी आमच्या सारख्या सैनिकांना आठवण ठेवून हा उपक्रम राबवितात याविषयी त्यांनी कौतुकास्पद आपले मनोगत व्यक्त केले. आणि देशाभिमान कसा जागृत ठेवला यावर प्रकाश टाकला ते अत्यंत भावुक झाले होते. शेवटी भारत माता की जय, अशी घोषणा देवून ललित कला केंद्र दणाणून सोडले. याप्रसंगी जसवंतसिंग राजपूत याने प्रास्ताविक केले.
प्राचार्य श्री. राजेंद्र महाजन यांनी मार्गदर्शनपर आपले मनोगतही व्यक्त केले. भिती पत्रकाच्या सजावटीसाठी विनोद बंजारा आणि ए.टी.डी. व्दितीय वर्ष वर्गातील विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.