सख्खा भाऊ. . .पक्का वैरी – तरूणाने केला स्वत:च्या भावाचा खून !

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील मितावली येथे लहान भावाने आपल्या मोठ्या भावावर विळ्याने वार केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

चोपडा तालुक्यातील मितावली येथे संदीप प्रताप पाटील आणि सतीश प्रताप पाटील हे दोन भाऊ वास्तव्याला होते. हे दोन्ही जण आपलील वडिलोपार्जीत शेती करून उदरनिर्वाह करत असत. दरम्यान, आज हे दोन्ही भाऊ आपल्या पारगाव शिवारात काम करण्यासाठी गेले होते. याप्रसंगी दोन्हींमध्ये जोरदार वाद झाला.

या वादात सतीश याने आपला मोठा भाऊ संदीप याच्यावर विळ्याने वार केले. यात संदीप प्रताप पाटील ( वय ३६ ) यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, थोड्या वेळाने याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर वार्‍यासारखी ही बातमी पसरल्याने ग्रामस्थही घटनास्थळी दाखल झाले. विभागीय पोलीस अधिकारी ऋषीकेश रावले, एपीआय गणेश बुवा पी.एस.आय.चंद्रकात पाटील यांनी आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळाला भेट देऊन तपास सुरू केला.

या दोन्ही भावांमध्ये नेमका कशावरून वाद झाला याची माहिती समजली नाही. दरम्यान, शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या प्रकरणी सतीश पाटील याला ताब्यात घेण्यात आले असून पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Protected Content