चोपडा प्रतिनिधी । येथील अमर संस्था संचलित बालमोहन उच्च माध्यमिक विद्यालय, लिटल हार्ट इंग्लिश मेडियम स्कुल व संत गजानन महाराज विद्यालय वेले या तिन्ही शाळेतील विद्यार्थ्यांनी फिल्ड आर्चरी या खेळात विभागीय पातळीवर यश संपादन करत सर्व विद्यार्थीनींची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा नाशिक येथे के.टी.एच.एम.कॉलेजमध्ये (दि.४) रोजी उत्साहात पार पडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील अमर संस्था संचलित लिटल हार्ट इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थीनी अंकिता बारेला व मनीषा बारेला १७ वर्षा आतील गटात तर बालमोहन विद्यालयातील इयत्ता १२ वीचा विद्यार्थी मंदार पाटील तर वेले येथील संत गजानन महाराज माध्यमिक विद्यालयातील इयत्ता १०वीची विद्यार्थींनी ललिता बारेला या सर्व विद्यार्थीनी फिल्ड आर्चरी (तीरंदाजी) या खेळात विभागीय पातळीवर यश संपादन करत सर्व विद्यार्थीनींची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे.
स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनींचे अमर संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष मनोज चित्रकथी, सचिव दीपक जोशी, संस्थेचे व्यवस्थापक मुकेश चौधरी, बालमोहन विद्यालयाचे व्यवस्थापक विजय दीक्षित, मुख्याध्यापिका प्रीती सरवैय्या, लिटल हार्ट इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक संजय खैरनार, संत गजानन महाराज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राकेश पाटील यांच्यासह आदींना कौतुक केले आहे. क्रिडा स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना व्ही.आर.पाटील, ललित सोनवणे, अमोल कोळी या क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे.