चोपडा प्रतिनिधी । येथील श्री व्यंकटेश बालाजी संस्थांनाचा सुमारे 350 वर्षांची परंपरा असलेला रथोत्सवास आज ९ आक्टोबर उत्साहास प्रारंभ करण्यात आला. हजारो भाविकांच्या साक्षिने रथोत्सवास सुरूवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात रथाचा मुक्काम राहणार असून उद्या सकाळी 10 वाजता रथ परतीच्या प्रवासाला सुरूवात होणार आहे.
साडे तीन शतकांची परंपरा असलेल्या श्री व्यंकटेश बालाजी संस्थानचा खान्देशात प्रसिद्ध असलेला रथोत्सव ९ व १० ला दरम्यान साजरा करण्यात येत आहे. आज ९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता रथाची विधवत पुजा करून रथोत्सवास सुरूवात करण्यात आली. गोलमंदिरा जवळील श्री.बालाजी मंदिरापासून श्री बालाजी महाराजांच्या रथोत्सवाला प्रारंभ झाला. आशा टॅाकीज, ग्रामदैवत श्री आनंदी भवानी मंदिर, रथ मार्गाने रथ आठवडे बाजार, पाटील दरवाजा मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुक्कामी येईल. त्याठिकाणी रात्रभर भाविकांच्या दर्शनासाठी राहिल.तर १० रोजी रथाच्या परतीच्या प्रवासाला सकाळी १० वाजता प्रारंभ होईल.बाजारपेठ मार्गाने पुन्हा गोलमंदिराजवळ येवून यंदाच्या वहनोत्सव रथोत्सवाचा समारोप होईल. या निमित्ताने रथोत्सव काळात शहरात दोन दिवसाची रथयात्रा देखील भरत असते.
या शहराच्या श्रध्देचा भाग असलेल्या सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संस्थांचे विठ्ठलदास छगणलाल गुजराथी, प्रवीण गुजराथी, प्रवीण गोपालदास गुजराथी, नितीन गुजराती (लाला भाई), संजय सोमाणी, विक्रम देशमुख, ताथ्या देशमुख व संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.