चोपडा प्रतिनिधी । राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 23 एप्रिल रोजी जळगाव आणि रावेर लोकसभा मंतदार संघातील चोपडा शहरातील बसस्थानक, शिवाजी चौक, ग्रामीण पोलीस स्टेशन याप्रमुख चौकात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, तहसीलदार अनिल गावित, नायब तहसीलदार राजेश पऊड, नोडल अधिकारी तथा गट शिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले, सहाय्यक नोडल अधिकारी युवराज पाटील यांच्या नियोजनानुसार, प्राचार्य राजेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली कलाशिक्षक राकेश विसपुते विवेकानंद विद्यालय, पंकज नागपूरे प्रताप विद्या मंदिर, कमलेश गायकवाड प्रताप विद्या मंदिर यांनी भव्य रांगोळी काढून जनजागृती केली.
चोपडा येथे रांगोळी काढून मतदानाबाबत जनजागृती
6 years ago
No Comments