डिजेबंदीचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई – सौरव अग्रवाल

चोपडा प्रतिनिधी । यावर्षीच्या गणेशोत्सवात डिजेला पूर्णपणे बंदी असणार आहे. डीजे वाजवणार्‍या मंडळावर तर कारवाई होईलच मात्र डीजे जप्त करण्याची कारवाई देखील करू असा इशारा आवाहन शांतता समितीच्या बैठकीत सहायक पोलीस अधीक्षक सौरव अग्रवाल यांनी दिला.

येथील कै शरदचंद्रिका सुरेश पाटील नगरपालिका नाट्यगृहात आयोजित शांतता समितीच्या बैठक झाली. या बैठकीस विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे सहायक पोलीस अधीक्षक सौरव अग्रवाल यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी अरुणभाई गुजराथी यांनी सर्व गणेशमंडळांचे प्रशासनाला सहकार्य राहील असे अश्‍वस्त केले. तर आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी सर्व कार्यकर्त्यांनी शांततेने मिरवणूक पार पाडून नवा आदर्श निर्माण करावा कायदा सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणार्‍यांना हेरून आधीच बंदोबस्त करावा विनाकारण युवकांवर गुन्हे दाखल करण्यात येऊ नये असे निर्देश दिलेत. यावेळी अमृतराव सचदेव, नगरसेवक डॉ. रवींद्र पाटील, प्रवीण पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

शांतता समितीच्या बैठकीला विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, आमदार प्रा.
चंद्रकांत सोनवणे, माजी नगराध्यक्षा डॉ.जया पाटील, पीपल्स बँकेचे व्हॉईस चेअरमन प्रवीण गुजराथी, सहाय्यक पोलीस अधीक्षक सौरव अग्रवाल, नायब तहसीलदार जितेंद्र पंजे, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष अमृतराज सचदेव, शिवसेनेचे गटनेते महेश उर्फ भैय्या पवार, नगरसेवक डॉ.रवींद्र पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख राजू बिटवा, शिवसेनेचे शहर प्रमुख आबा देशमुख, नरेश महाजन, मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल वानखेडे, भाजपचे शहराध्यक्ष रवी मराठे , माजी नगरसेवक चिरागोद्दीन जहागीरदार, काँग्रेसचे शहराध्यक्ष के.डी.चौधरी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष धर्मेंद्र मगरे, नौमान काझी, पप्पू स्वामी, भाजपा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष यश शर्मा, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनायक लोकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार उपस्थित होते.

प्रास्ताविक व सुत्रसंचालन पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांनी केले. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Protected Content