चोपडा प्रतिनिधी । चोपडा सहकारी सूत गिरणीच्या आज झालेल्या बैठकीत कोरोनावर मात करणारे माजी आमदार कैलास गोरख पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
तापी सहकारी सूतगिरणीच्या संचालक मंडळाची सभा आज संस्थेचे चेअरमन माजी आमदार कैलास गोरख पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन माजी आमदार तथा महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष पितृतूल्य कै. डॉ. सुरेशदादा पाटील यांना सूतगिरणीच्या व तालुक्यातील तमाम शेतकर्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मान्यवर दिवंगत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संस्थेचे चेअरमन तथा तालुक्याचे नेते कैलास गोरख पाटील हे कोविड आजारातून सुखरूप बाहेर पडले म्हणून त्यांचे अभीष्टचिंतन करण्यात आले.
तालुक्यातील शेतकर्यांच्या वतीने व सूतगिरणीच्या सर्व सभासदांच्या वतीने कैलास पाटील यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी कैलास पाटील यांच्या कार्याचा गौरव संचालक के. डी. चौधरी यांनी अभीष्टचिंतन देताना केले. कोरोना संकटातून सुखरूप बाहेर पडलेले संचालक तुकाराम राजधर पाटील, रामदास एकनाथ चौधरी, जनरल मॅनेजर विजय पाटील यांनाही यावेळी शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी व्हाईस चेअरमन प्रभाकर भिमराव पाटील, संचालक माधवराव ऊत्तमराव पाटील, भागवत शंकरराव पाटील, कालिदास डुमन चौधरी, संजयकुमार भालचंद्र पाटील, प्रकाश पंडित रजाळे, राजेंद्र भास्करराव पाटील, सौ. जागृती संजय बोरसे, सौ. रंजना श्रीकांत नेवे व सूतगिरणीचा स्टाफ या सर्वानी चेअरमन यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.