अरूणभाई गुजराथींनी केली शेतकर्‍यांच्या नुकसानीची पाहणी

चोपडा प्रतिनिधी । वादळी पावसामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी माजी विधानसभाध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांनी आज केली. याप्रसंगी शेतकर्‍यांना धीर देऊन नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

याबाबत वृत्त असे की, मान्सूनपुर्व वादळी पावसामुळे तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. विशेष करून याचा मोठा फटका वर्डीसह परिसरातील गावांना बसला आहे. अनेक शेतकर्‍यांची यात मोठी हानी झाली आहे. या अनुषंगाने आज माजी विधानसभाध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांनी या परिसरातील शेतकर्‍यांच्या थेट बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना लवकरात लवकर शासकीय मदत मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.

याप्रसंगी अरुणभाई गुजराथी यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी सभापती विनायकराव चव्हाण, डॉ. कांतीलाल पाटील, मच्छींद्र साळुंके, सरपंच सौ.वैजाली सुनिल पाटील,उपसरपंच दिपक पाटील, मधुकर पाटील, सतीश पाटील आदींसह परिसरातील मान्यवर होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.