चोपडा नगरपालिकेच्या करवाढी विरोधात “धडक मोर्चा”

WhatsApp Image 2019 08 23 at 7.45.56 PM 1

चोपडा, प्रतिनिधी | दुष्काळग्रस्त चोपडा तालुका असताना देखील नगरपालिकेने घरपट्टी २५% वाढवुन व घनकचरा व्यवस्थापणात देखील कर वाढ झालेली आहे तसेच १२ ते १३ दिवसांत नळाला पाणी येते अश्या विविध समस्या असताना देखील कर वाढ का ? याबाबत जाब विचारण्यासाठी आज दि २३ रोजी सकाळी “धडक मोर्चा” डॉ.चंद्रकांत बारेला यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला

सविस्तर असे की, आज सकाळी ११ वाजता पोलीस ग्राउंड वरून डॉ. चंद्रकांत बारेला यांच्या नेतृत्वाखाली शहरातील शेकडो लोकांच्या समवेत धडक मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा पोलिस ग्राउंड, चिंच चौक, गुजराथी गल्ली, गोलमन्दिर, मेन रोड मार्गे नगरपालिकेवर नेण्यात आला. यावेळी नगरपालिकेत मोर्च्यांला संबोधित करतना डॉ. चंद्रकांत बारेला, शरद पाटील, राजेंद्र शिंदे यांनी सांगितले की, करवाढी त्वरित मागे घेण्यात यावी. महाराष्ट्रातील कोणत्या नगरपालिकानी करवाढ केली त्याची यादी आम्हाला दयावी. तसेच करवाढी नैसर्गिकरित्या वाढवावी असा शासनाचा निर्णय आहे तर त्या निर्णयाचा जी आर देण्यात यावा व करवाढी कमी करणार नाही तो पर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असा पवित्रा घेत मोर्चाकऱ्यानी नगरपालिकेच्या आवारात ठाण मांडला होता. मोर्चा मोरचेकाऱ्यानी सर्व मागण्याचे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले. मुख्याधिकारीनी की , ही करवाढ नैसर्गिक रित्या आहे खरं तर ही करवाढ ४६% वाढ व्हायला पाहिजे होती. परंतु ती नगरसेवकांच्या बैठकीत फक्त २५% वाढ करण्याचा निर्णय झाला ही करवाढ कमी मी करू शकत नाही. तुम्ही शासन दरबारी, न्यायालयात, आमच्या वरिष्ठांनाकडे याबाबत दाद मागा यावर संप्तत मोर्च्यांचे आयोजक डॉ बारेला यांनी व शरद पाटील यांनी सांगितले की, आम्हाला कुठे जायचे ते सांगू नका ते सर्व मार्ग आम्हाला माहीत आहेत शासनाने तुम्हाला आमच्या समस्या सोडवण्यासाठी येथे नियुक्त केले आहे आमची बाजू शासनाकडे तुम्ही मांडा असे सांगितले असता मुख्यधिकारी यांनी मोर्चाला सोडून आपल्या दालनात निघून गेले यावर मोर्चेकर्ते यांनी नगरपालिकेच्या पायऱ्यावरच ठाण मांडले होते जवळपास ३;३० पर्यंत तोडगा निघाला नव्हता मात्र एक पत्रक नगरपालिकेच्या प्रशासनाकडून मिळाले मात्र त्यात किती करवाढ करावी याबाबत स्पष्ट उल्लेख नसल्याने जनतेची ही निव्वळ दिशाभूल करत आहे. मी जनतेला आवाहन करू इच्छितो की, त्यांनी जाचक करवाढ केलेली आहे. त्याबाबत त्यांनी कोणतेही ठोस उत्तर दिले नाही. त्यासाठी आता करवाढीची कोर्टाची नोटीस आल्या शिवाय कोणीही घरपट्टी भरू नये तसेच याबाबत आम्ही कोर्टात दाद मागणार आहोत जनहित याचिका दाखल करणार आहोत असे ही डॉ चंद्रकांत बारेला  यांनी ‘लाइव्ह ट्रेंड न्यूज’शी बोलतांंना सांगितले.

Protected Content