चोपडा प्रतिनिधी | येथील गौरव साळुंखे यांनी युपीएससी परिक्षेत मिळविलेल्या यशामुळे त्यांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुंबईत ह्रद्य सत्कार केला.
चोपडा येथील रहिवासी असलेले गौरव रवींद्र साळुंखे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएससीच्या नागरी सेवा परिक्षेत देदीप्यमान यश संपादन केले आहेत. या परिक्षेत त्यांना संपूर्ण देशातून १८२ वी रँक मिळाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
दरम्यान, गौरव साळुंखे यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत विशेष सत्कार केला. मुख्यमंत्र्यांनी गौरव साळुंखे यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत आदी उपस्थित होते.