चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरात तरूण व तरूणीचा निर्घृण खून झाला असून ऑनर किलींगचा हा प्रकार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
चोपडा शहर डबल मर्डरने हादरले आहे. काल रात्री उशीरा राकेश संजय राजपूत (वय २१) आणि वर्षा समाधान कोळी (वय २०) या तरूण तरूणीला क्रूर पध्दतीत संपविण्यात आले. यातील तरूणावर गोळ्या झाडण्यात आल्या असून तरूणीचा गळा आवळून तिचा खून करण्यात आला. रात्री साडेदहाच्या सुमारास हे कृत्य घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवून दोन आरोपींना अटक केली असून हे दोन्ही अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, या संदर्भात रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. हा प्रकार ऑनर किलींगचा प्रकार असल्याचा प्राथमिक अंदाज समोर आला आहे. मात्र पोलिसांनी याला पुष्टी दिलेली नाही. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.