चोपडा प्रतिनिधी । येथील उपजिल्हा रूग्णालयात मोठ्या प्रमाणामध्ये असुविधा असून यांचे निराकरण करण्याची मागणी करणारे निवेदन आज भाजपने तहसीलदारांना दिले.
याबाबत वृत्त असे की, कोविड रुग्णांना मूलभूत सुविधा पुरवीणे करिता केंद्र शासनाने कोट्यावधीचा निधी या परिस्थितीशी लढण्या करिता राज्यांकडे सुपूर्द केलेला आहे. मात्र अद्यापही त्या निधीची रक्कम चोपडा उप जिल्हा रुग्णालयास प्राप्त झालेली नाही. राज्य शासनाच रुग्ण सुविधेकडे जणीव पूर्वक पूर्णपणे दुर्लक्ष झालेने राज्यशासना विरुद्ध तालुक्यातील नागरिकांमध्ये प्रचंड अशी चीड निर्माण झालेली आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी राज्याने रुग्णालयास तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा. या मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे वतीने चोपडा तहसीलदार अनिल गावित यांना तालुकाध्यक्ष प्रकाश पाटिल, शहराध्यक्ष तुषार पाठक यांचे हस्ते देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात कोरोनाने गंभीर परिस्थिति धारण केलेली असतांना, त्यातच जिल्हा प्रशासनाने ‘आपल झाल थोड़ आणि जावयाने धाडल घोड’ या म्हणी प्रमाणे शेजारचे तालुक्यामधील कोव्हीड पॉझिटिव्ह, क्वारंटाईन पेशंट ही या जिल्हा उप रुग्णालयात आणून ठेवत आहेत. यामुळे मुळातच या रुग्णालयातील तोडक्या स्वरूपातील असलेल्या औषधी, भोजन, सुरक्षा व्यवस्था इत्यादी सारख्या मूलभूत सुविधावर प्रचंड ताण पडत आहे. रुग्णांना या व अन्य प्रकारच्या पुरवावयाच्या मूलभूत सुविधा साठींचा निधी राज्य शासना कडून येत नाही, म्हणून तालुक्यातील समाज सेवक धुरीणांनी रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांचे हाल होऊ नये ही सामाजिक कर्तव्य भावनेने जनतेतून लोकवर्गणी गोळा करून आवश्यक साधन सुविधांची पूर्तता करीत आहे. मात्र शासनाला याचे काहीही सोयर सुतक दिसून येत नाही. यामुळे राज्य शासनाचे उपजिल्हा रुग्णालयातील मूलभूत सुविधा साठी तातडीने केंद्राकडून प्राप्त झालेला निधी सुपूर्द करून रुग्णांनचे होत असलेले हाल थाबवावेत. असेही या निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे.
या निवेदनावर भाजपचे जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील, माजी तालुका प्रमुख व पं. स. सभापती आत्माराम म्हाळके, विधान सभा क्षेत्रप्रमुख प्रदीप पाटील, जिल्हापरिषद सदस्य गजेंद्र सोनवणे, तालुका अध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष तथा नगरसेवक गजेंद्र जैसवाल , कृषि उत्पन्न बाजार समिति संचालक धनंजय पाटील, माजी शहराध्यक्ष राजु शर्मा, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र पाटील,भाजपा उपाध्यक्ष देविदास पाटील, विठ्ठल पाटील, प्रवीण चौधरी, लक्ष्मण माळी,गोपाल पाटील, सरचिटणीस हनुमंत महाजन, मनोहर बडगुजर, सुनील सोनगिरे, चिटणीस गणेश पाटील,भरत सोनगिरे, माजी नगर सेवक पप्पू सोनार, व्यापारी आघाडी अध्यक्ष हेमंत जोहरी, ओबीसी सेल अध्यक्ष सुरेश चौधरी, अनुसूचित जाती जमाती सेल अध्यक्ष राज घोगरे भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सुनील चौधरी, सरचिटणीस रितेश शिंपी, भाजपा प्रसिद्धी प्रमुख यशवंत जडे, कार्यालय मंत्री मोहित भावे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या स्वाक्षर्या आहेत. निवेदन सादर करताना सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.