चोपडा प्रतिनिधी । विद्यार्थांच्या संशोधनवृत्तीस चालना मिळण्यासाठी बालमोहन उच्च माध्यमिक विद्यालयाचे व्यवस्थापक विजय दीक्षित व प्राचार्या प्रीती सरवैय्या यांनी अमर संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त विद्यालयाच्या आवारात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. त्याला मुख्याध्यापकांसह सर्वांचे सहकार्य लाभले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अमर संस्थेचे सचिव दिपक जोशी हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे व पर्यवेक्षक म्हणून विज्ञान शिक्षक म्हणून प्रताप विद्यालयाचे शिक्षक नवनीत राजपूत, सद्गुरू कन्या विद्यालयाचे ए.पी. पाटील, कोळंबा माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक संजय पाटील, वडती येथील सानेगुरुजी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक अतुल चव्हाण हे होते. कार्यक्रमाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते तोफ मधून फुलांचा वर्षाव करून करण्यात आला. ही तोफ वडती येथील साने गुरुजी विद्यालयाचा विद्यार्थी रियाज तडवी याने उपक्रमशील शिक्षक अतुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण केली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सानेगुरुजी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय जोशी यांनी केले.
बालवाडी, इयत्ता 1 ली ते 12 पर्यंतच्या विद्यार्थांनी या प्रदर्शनात आपला सहभाग नोंदवला. १५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग सादर केले. लहान गट व मोठा गट अशी विभागणी करून शाळेच्या पटांगणामध्ये विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले. बालवाडीच्या गटात प्रथम क्रमांक वेदिका गोरख विसावे व मनस्वी संदिप पाटील यांनी मिळवला. प्राथमिक गटामध्ये प्रथम क्रमांक जानवी प्रदीप धनगर, भाग्यश्री कपिल कदम, समर्थ प्रफुल्ल पवार, हर्षल गणेश मावळकर या विद्यार्थ्यांनी पटकावले, उच्च प्राथमिक गटात वडती येथील साने गुरुजी माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी रियाज खलील तडवी याने प्रथम क्रमांक पटकावला तर माध्यमिक गटात साने गुरुजी विद्यालयाचा विद्यार्थी साहिल जाकिर पिंजारी याने प्रथम क्रमांक पटकावला. विज्ञान प्रदर्शनात शिक्षकांनी देखील सहभाग नोंदवला या शिक्षक गटातून प्रथम क्रमांक बालमोहन माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका अनिता मैलागीर दुसरा क्रमांक रोहिणी कापडणे, तिसरा क्रमांक स्मिता बाविस्कर तर उत्तेजनार्थ म्हणून लिटल हार्ट इंग्लिश मेडिअमच्या शिक्षिका माधवी जैन यांनी पटकावला.
यांची होती उपस्थिती
यावेळी प्रताप विद्या मंदिरचे माजी शिक्षक सुधीर चौधरी, अमर संस्थेचे व्यवस्थापक मुकेश चौधरी, बालमोहन उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या प्रीती पाटील, बालमोहन प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप चौधरी, संत गजानन महाराज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.डी.पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी कापडणे यांनी केले.
यावेळी बोलताना बालमोहन उच्च माध्यमिक विद्यालयाचे व्यवस्थापक विजय दीक्षित म्हणाले या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन आल्याचे त्यांनी सांगितले. ‘विद्यार्थांच्या अंगी वैज्ञानिक दृष्टीकोन कायम राहण्यासाठी आम्ही शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. खूप छान व लोकोपयोगी प्रयोगाची मांडणी विद्यार्थांनी या प्रदर्शनात केली. त्यामुळे हे प्रदर्शन विद्यार्थांच्या संशोधनवृत्तीस नक्कीच चालना देणारे ठरेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.