चोपडा प्रतिनिधी । मालवाहू रिक्षाला खासगी ट्रॅव्हल्सने दिल्याने झालेल्या अपघातात संबंधीत रिक्षाचा चालक ठार झाला असून यात एक जण जखमी झाला आहे.
सुरतला जाणार्या खासगी कंपनीच्या ट्रॅव्हल्सने गलंगी पोलिस चौकीजवळ गलंगीहून हातेडकडे जाणार्या मालवाहतूक रिक्षेला धडक दिली. रात्री साडेआठच्या सुमारास झालेल्या या अपघातामध्ये रिक्षाचालक सुदर्शन रतीलाल बाविस्कर (वय ३०, रा.गंलगी) हा जागीच ठार झाला. तर ट्रॅव्हल्सचा चालक देखील जखमी झाला आहे.
दरम्यान, या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत चोपडा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.