चोपडा प्रतिनिधी । कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली पुरस्कृत जन शिक्षण संस्थान जळगाव आयोजित दि 16 जुलै ते 31 जुलै स्वच्छता पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे.
या स्वच्छता पंधरवाडाचे उदघाटन दि. 16 रोजी सकाळी 10 वाजता जनशिक्षण संस्थानच्या अध्यक्षा डॉ. स्मिताताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वच्छतासंदर्भात शपथ घेण्यात आली. स्वच्छतेचे महत्व यावेळी जाणून घेण्यात आले. स्वच्छता पंधरवाडा यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याप्रसंगी जन शिक्षण संस्थानचे संचालक रवींद्र कुडाळकर यांनी स्वच्छता पंधरवाडयाचे प्रयोजन व महत्व या विषयावर मनोगत व्यक्त केले आहे. संस्थेचे पदाधिकारी, शिक्षिका व प्रशिक्षणार्थी यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत साळुंखे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदीप सोनवणे, विकास भदाणे, कीर्ती पाटील व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांनी सहकार्य केले.