चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील धनगर समाज महासंघातर्फे समाजातील विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या तसेच १० व १२ वीतील गुणवंत विद्यार्थांचा गुणगौरव सोहळाच्या कार्यक्रम नुकताच धनगर गल्लीतील “धनगरमढीत “आयोजित करण्यात आला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुरुवातीला पुण्यश्लोक आहिल्यादेवीच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार डॉ. अशोक कंखरे यांनी केला. त्यानंतर १० व १२ वीतील गुणवंत विद्यार्थांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भरत न्हायदे यांनी समाजाची दिशा व दशा यावर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. नरेंद्र शिरसाठ, योगेश सोनवणे व रमेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती आत्माराम म्हाळके होते. कार्यक्रमासाठी डॉ. नरेंद्र शिरसाठ, कवी रमेश पाटील, आर.सी.भालेराव, विठ्ठल बोरसे, साहेबराव कंखरे, महापारेषणचे उपकार्यकारी अभियंता योगेश सोनवणे, भगवान नायदे, भरत न्हायदे, गुलाब धनगर, प्रविण सावळे, अरुण बाविस्कर, योगेश कंखरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिपक धनगर यांनी केले. यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.अशोक कंखरे, नाना धनगर, शाम नायदे, पिंटु धनगर, दिनेश न्हायदे, दिलीप बागुले, आबा शिरसाठ, आबा बिह्राडे यांच्यासह आदी समाज बांधवानी परिश्रम घेतले आहे.