चोपडा, प्रतिनिधी | चोपडा विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार प्रभाकर सोनवणे यांनी गल्लीपासून ते तांड्यापर्यंत प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांच्या प्रचाराच्या धडाक्याने विरोधक धास्तावले आहेत. त्यांच्या प्रचारात शिवसेना नेते व माजी आमदार कैलास पाटील यांनीही सक्रीय सहभाग घेतला आहे.
मतदार संघात ठिकठिकाणी प्रभाकर सोनवणे यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. श्री. सोनवणे यांची ग्रामीण भागाशी नाळ जुळलेली असल्यामुळे ते शेकऱ्यांच्या व ग्रामीण जनतेच्या समस्या जाणून आहेत. चोपडा मतदार संघ हा गेल्या बराच काळापासून मागासलेला मतदारसंघ राहिला आहे. युती झाल्यापासून ही जागा शिवसेनेकडे असल्याने त्यांनी आता बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी केली आहे.
कोळी समाजाचे नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष स्व.भिलाभाऊ सोनवणे यांचे बंधू म्हणून त्यांच्याकडे मोठ्या आदराने पाहिले जाते. कोळी समाजावर स्व. भिलाभाऊ यांचा मोठा प्रभाव राहिलेला आहे. मतदार संघाला भविष्यात सक्षम, चारित्र्य संपन्न नेतुत्व मिळावे, अशी जनतेची नेहमीच मागणी राहिलेली आहे. चोपडा मतदार संघ हा कोळी व मराठा बहुल असून ह्या विधानसभेच्या जागेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.