चोपडा-अमळनेर येथून मोटार सायकली चोरणाऱ्यास अटक

aaropi

जळगाव प्रतिनिधी । चोपडा व अमळनेर शहरातून गेल्या काही दिवसांपासून मोटार सायकल चोरीला जाण्याचा घटना घडत होत्या, मात्र आरोपी हाती लागत नव्हता. येथील पोलिसांनी त्याला नुकतेच ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस पथकातील पो.हे.कॉ. नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, मनोज दुसाने, प्रवीण हिवराळे यांनी मध्यप्रदेशात जाऊन आरोपीचा शोध घेतला असतांना आरोपी सुनील महादु ब्राम्हणे (रा.केरमला, ता.वरला, जि. बडवाणी) याला ताब्यात घेतले. हा आरोपी चोपडा, अमळनेर, धरणगाव परिसरात येऊन मोटार सायकली चोरून पुन्हा आपल्या गावी पळून जात होता. या आरोपीच्या घरामागील बाजूस चोपडा शहरातून चोरलेल्या दोन व अमळनेर शहरातून चोरलेली एक अशा मोटार सायकल अशा एकूण तीन मोटर सायकली त्याने लपवून ठेवलेल्या आढळून आल्या. ही वाहने जप्त करण्यात आली असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्याला पुढील तपासासाठी चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content