Home Cities चाळीसगाव पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा चाळीसगाव शिवसेनेतर्फे जाहीर निषेध

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा चाळीसगाव शिवसेनेतर्फे जाहीर निषेध


चाळीसगाव (प्रतिनिधी) पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा जवळ लोटू मोड येथे जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केंद्रीय राखीव दलाच्या सीआरपीएफ ताफ्यावरवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा चाळीसगाव शिवसेनेतर्फे आज जाहीर निषेध करण्यात आला.

पाकिस्तानच्या छुप्या पाठिंब्याने सुरू असलेल्या या भ्याड हल्ल्याचा चाळीसगाव शिवसेनेतर्फे तीव्र निषेध करण्यात आला असून तहसीलदार कैलास देवरे यांना एक निवेदन देण्यात आले आहे. या हल्ल्याचे केंद्रीय सरकारने ताबडतोब जशास तसे उत्तर देऊन बदला घ्यावा, अशा तीव्र भावनाही यावेळी शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आल्या. या निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील, तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, शहर प्रमुख नाना कुमावत, उमेश दादा गुंजाळ, बाजार समिती उपसभापती महेंद्र पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख भिमराव खलाणे, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, युवा सेना तालुकाप्रमुख प्रशांत कुमावत, शहर प्रमुख रवींद्र चौधरी, शैलेंद्र सातपुते, निलेश गायके, नकुल पाटील, चेतन कुमावत, अजित देशमुख, नागेश मुगले, मनोज कुमावत, युवराज कुमावत, योगेश चव्हाण,संजय पाटील, संदीप शिंदे, मोहन परदेशी, रामेश्वर चौधरी, रोहित जाधव, दीपक कोळी, जगदीश महाजन, शिवाजी राजपूत, विजय पाटील, जावेद भाई,रघुनाथ कोळी आदी शिवसैनिकांच्या सह्या आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound