जळगाव प्रतिनिधी । छोटा पुढारी म्हणून राज्यभरात ओळखल्या जाणाऱ्या श्रीगोंदयाच्या घनःश्याम दराडे यांनी आज जळगावात हजेरी लावत जळगाव लोकसभेचे राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची राष्ट्रवादी कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध सामाजिक व राजकीय मुद्यावर प्रत्येक्ष मुलाखत घेत संवाद साधला.
ते म्हणाले की, आपण लोकसभा निवडणूकीला समोरे जातांना भाजपा सरकारने निवडणूकीपूर्वी जनतेस अनेक अश्वासने दिलेली होती. मात्र या सरकारने शेतकरी सह सर्वसामांन्यांना दिलेल्या एकाही अश्वासनांची पूर्तता केलेली दिसत नाहीत. या शिवाय अनेक मुद्दे आपण प्रचारात जनतेस कसे पटवून देणार आहेत. तसेच आपण आपल्या पालकमंत्रिपदाच्या काळात आपल्या मतदार संघात साधलेल्या विविध विकास कामांसोबतच जिल्हाभरात कोण कोणत्या विकास कामांना चालना दिली .याची माहिती घेत आपण या निवडणूकीत खासदार झाल्यावर जिल्हयातील बेरोजगार तरुणांना साठी रोजगार निमिर्तीसाठी कोणते प्रयत्न करणार ? जनतेस पिण्याचे पाण्यासोबतच शेतकऱ्यांच्या शेतीचे सिंचन क्षेत्र वाढावे यासाठी काय करणार ? अशा अनेक मुद्दयांवर त्यांनी सवांद साधला. त्यांच्या अशा अनेक प्रश्नांना मा. देवकर आप्पा यांनी योग्य ती समर्पक उत्तरे दिलीत. तसेच समाजकारण अन् राजकारण करतांना जनतेस दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यातच मला खरा आनंद मिळतो. माझ्या आज पर्यंतच्या राजकीय जीवनातील यशाचे हेच मोठे गमक असल्याचे त्यांनी यावेळी सागितले. यावेळी पक्ष कार्यालयात जिल्हा बॅकेचे माजी संचालक वाल्मिक पाटील, मजूर फेडरेशनचे सभापती लिलाधर शेठ तायडे ,लिगल सेल जिल्हाध्यक्ष अॅड. सचिन पाटील यांच्यासह ईतर पदाधिकारी उपस्थितीत होते.