भारताला घेरण्यासाठी चीनचे १२ देशांमध्ये लष्करी तळ

 

 

न्यूयॉर्क, वृत्तसंस्था । अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या पँटागॉनच्या अहवालामध्ये चीनसंदर्भात भारताला इशारा देताना धक्कादायक खुलासा केला आहे. भारताच्या तीन शेजारी देशांबरोबरच चीन भारताच्या आजूबाजूच्या एक डझन देशांमध्ये आपले लष्करी तळ स्थापन करण्याच्या प्रयत्नात असल्याचे पँटागॉनने म्हटलं आहे.

दक्षिण आशियामध्ये आपले लष्करी सामर्थ्य आणि दबदबा कायम रहावा म्हणून चीन वेगवेगळ्या देशांमध्ये लष्करी तळ निर्माण करत असल्याचे या अहवालात म्हटलं आहे. अगदी आफ्रिकेतील लहान देशांपासून ते पाकिस्तान श्रीलंकेपर्यंत अनेक देशांमध्ये लष्करी तळ उभारण्याच्या हलचाली चीनकडून सुरु असल्याचे अमेरिकेने म्हटलं आहे.

पँटागॉनच्या या अहवालानुसार पाकिस्तान, श्रीलंका आणि म्यानमारबरोबरच थायलंड, सिंगापूर, इंडोनेशिया, संयुक्त अरब अमीरात, केनिया, सेशल्स, टांझानिया, अंगोला आणि तझाकिस्तानमध्ये लष्करी तळ निर्माण करण्याच्या प्रकल्पांवर चीन काम करत आहे. . पँटागॉनने ‘मिलेट्री अ‍ॅण्ड सिक्युरिटी डेव्हलपमेंट इन्वॉलविंग द पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना २०२०’ नावाचा वार्षिक अहवाल मंगळवारी अमेरिकन काँग्रेससमोर सादर केला. या अहवालामध्ये जिबूतीमध्ये चीनचं लष्करी तळ असण्याची शक्यता पँटागॉन व्यक्त केली आहे. जिबूती हा आफ्रिका खंडामधील एक लहानसा देश आहे.

जिबूतीमध्ये चीनच्या लष्करी तळाबरोबरच नौसेना, वायूसेना आणि लष्कराला मदत करण्यासाठी तळ उभारला जात असल्याची शक्यता पँटागॉनने व्यक्त केलीय. ‘जगभरामध्ये पसलेलं चिनी सैन्याच्या लष्कारचं जाळ हे अमेरिकन सैन्याच्या मोहिमांसाठी अडथळा ठरु शकतं. अमेरिकेविरोधातील लष्करी कारवायांना या सैन्य तळांकडून पाठिंबा मिळू शकतो,’ अशी भीती पँटागॉनने या अहवालामध्ये व्यक्त केली आहे. चीनने नामीबिया, वनूआतू आणि सोलोमन या बेटांवर आधीच ताबा मिळवला असल्याचेही या अहवालात म्हटलं आहे.

Protected Content