सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी 10 वर्षांखालील मुलं आणि जेष्ठाना प्रवेशबंदी

नाशिक वृत्तसंस्था | अनेक भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या सप्तश्रृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी १० वर्षांखालील मुलं आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आलीय. वाढत चालेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येकडे पाहत या वयोगटातील मुलं आणि जेष्ठाना जास्त धोका असल्याने खबरदारी म्हणून नाशिक येथील वणीच्या सप्तश्रृंगी देवस्थान समितीने हा निर्णय घेतला आहे.

नाशिकमध्ये सातत्याने वाढत चाललेली रुग्ण संख्या लक्षात घेत खबरदारीचा उपाय म्हणून लहान आणि ज्येष्ठांना प्रवेश बंदीचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला असून अशा स्वरूपाचा निर्णय घेणारे हे पहिलेच देवस्थान ठरले आहे. या निर्णयाचं स्वागत करत राज्यातील इतर मंदिर संस्थानंही असा निर्णय घेतात का याकडेही भाविकांचे लक्ष असून यापूर्वीच दर्शनास जाण्याचं नियोजन भाविकांकडून होत आहे.

 

Protected Content