
चाळीसगाव (प्रतिनिधी) मुलं ही देवाघरची फुलं असून भारताच्या भावी आधारस्तंभ असलेल्या या पिढीला आपण सारेजण जपूया,त्यांना व्यसनापासून दूर ठेवून निरोगी आयुष्य जगायला शिकवूया, असे आवाहन डॉ.विनोद कोतकर यांनी केले. ते येथील आई फाऊंडेशनतर्फे आयोजित ‘आरोग्य संपन्न चाळीसगाव’ मोहीमेअंतर्गत जि.प.प्राथमिक शाळा टाकळी प्र.चा. आणि ओझर येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते.
यावेळी डॉ.कोतकर पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांना आरोग्याबाबत स्वतः काळजी घेण्याबाबत वैयक्तिक स्वच्छता ,संतुलित आहार,व्यायाम या त्रिसुत्रीचा योग्य वापर केल्याने अनेक आजारांना आपण दूर ठेवू शकतो असे विस्तृतपणे मार्गदर्शन त्यांनी याप्रसंगी केले. आई फाऊंडेशनतर्फे दोन्हीही शाळांना प्रथमोपचार पेटी सुधिरजी चव्हाण यांचे हस्ते भेट म्हणून देण्यात आली. यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती बागुल,श्रीमती बडगे व सर्व शिक्षक बंधूभगिनी यांचे सहकार्य लाभले.