जळगाव प्रतिनिधी । कामानिमित्त शहरात आलेल्या नराधमाने घरासमोर खेळत असलेल्या बालिकेला उचलून नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सायंकाळी उघडकीस आली. नराधमास नागरीकांनी चोप देवून शनीपेठ पोलीसांच्या ताब्यात दिले.
याबाबत माहिती अशी की, युवराज कडू होंडाळे वय-36 रा. विचवे ता. बोदवड हा कामाचे पैसे घेण्यासाठी नेरी नाक्याजवळील लक्झरी स्थानकावर सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास आला होता. त्यावेळी त्याच ठिकाणी राहणाऱ्या चार वर्षीय चिमुकलीला एकटी पाहून तिचा उचलून बाजूच्या ठिकाणी उभी असलेली लक्झरीत घेवून अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होता. ही बाब बालिकेच्या लहान भावाला लक्षात आल्यानंतर त्याने हा प्रकार आईवडीलांना सांगितले. त्यांनी तातडीने लक्झरीजवळ आल्यानंतर बालिकेचा शोध घेतला. त्यावेळी संशयित आरोपी युवराज होंडाळे हा लपूर बसला होता. बालिकेला ताब्यात घेवून नागरीकांनी चांगले चोपून शनीपेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. विभागीय पोलीस अधिकारी निलाभ रोहन यांनी भेट देवून प्रकाराबाबत विचारणा केली. रात्री उशीरापर्यंत शनीपेठ पोलीसात आरोपी युवराज होंडाळे यांच्या विरोधात प्रोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.