अरुणभाई गुजराथी यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा

eb0a7ad4 df81 4fc6 bcd4 77855210b8ed

चोपडा (प्रतिनिधी) राष्ट्रवादी पक्षाच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्वाभिमान सप्ताह राबवण्यात येत आहे.

 

माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या वाढदिवसानिमित्त दि १० जून पासूनच कार्यक्रमाना सुरुवात झाली यात वड्री येथील विरवाडे खोदारी नाला खोली करण्यासाठी चोपडा पिपल्स बँक सार्वजनिक सेवा ट्रस्ट व भारतीय जैन संघटना तसेच वड्री ग्रामस्थांच्या मदतीने खोली करण कामाचे भूमिपूजन अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे २० व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. समाज कार्य महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच दि ११ जून रोजी सकाळी ८.०० वाजता उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. मा. अरुणभाई गुजराथी यांच्या ७८ व्या वाढदिवसानिमित्त ७८ ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. शेतकी संघाच्या बिल्डिंगमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेन्द्र पाटील यांच्या संपर्क कार्यलयाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच शेतकी संघ कॉम्प्लेक्समध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आले आहेत, त्यांचे लोकार्पण करण्यात आले. गरीब विध्यार्थीना ७८ व्या वाढदिवसानिमित्त ७८ वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच आंबेडकर चौकात अल्पदरात वही विक्री केंद्राचे उद्धघाटन करण्यात आले. कृषि उत्पन्न बाजार समितीत विविध विकास कामांचे उद्धघाटन करण्यात आले. वरील सर्व कार्यक्रम मा. अरुणभाई गुजराथी यांच्या उपस्थितीत त्याच्या हस्ते करण्यात आले. दि ११ जून रोजी सकाळपासूनच शुभेच्छा देणाऱ्याची रीघ लागली होती. यात चंद्रहास गुजराथी, जगदीशचंद्र वळवी, डी. पी.साळुंखे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, कॉग्रेस आयचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीपभैय्या पाटील, तालुकाध्यक्ष राजाराम पाटील शहर अध्यक्ष के.डी. चौधरी, नेमीचंद जैन घनश्याम अग्रवाल, आनंदा रायसिंग, जिल्हा होमगार्डचे निवृत्त अधिकारी कोळपकर, नगराध्यक्ष सौ. मनीषा चौधरी, नगरपालिका गटनेता जीवन चौधरी, अॅड. घनश्याम पाटील, जि. प. सदस्या सौ. नीलम पाटील, प्रविण गुजराथी, माजी जि.प. अध्यक्ष गोरख पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगन पाटील, डॉ. सुरेश बोरोले, असे विविध पक्षाचे हजारो पदाधिकारी, व्यापारी, विविध संघटनाचे पदाधिकारी, डॉक्टर्स, वकील, संस्थाचालक यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. जळगाव, धुळे, नंदुरबार, जिल्ह्यातूनही अनेक पदाधिकारी आलेले होते. वरील सर्व कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, शहर अध्यक्ष प्रा. धर्मेंद्र मगरे, महिला अध्यक्षा सौ. भारती बोरसे, शहर अध्यक्षा सौ. कृष्णाताई पवार आदीनी परिश्रम घेतले.

Protected Content